भारतात फार कमी लोक असतील, ज्यांनी आयुष्यात एकदाही पार्ले-जी बिस्किट खाल्ले नसेल.
पार्ले- जी या बिस्किटाची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही. अवघ्या ५ रुपयांमध्ये मिळणारे हे बिस्किट बहुतेकांना आवडते.
अतिशय स्वस्त आणि चविष्ट हे बिस्किट केवळ भारतातच लोकप्रिय नाही तर जगभरातील अनेक देशांमध्ये ते आवडीने खाल्ले जाते.
परेदशात राहणारे अनेक भारतीय पार्ले-जी खाण्याला प्राधान्य देतात. पण पार्ले-जी बिस्कीट अमेरिकेत किती रुपयाला मिळते, हे तुम्हाला माहितीये का?
भारतात पार्ले-जी बिस्किटाचे 65 ग्रॅमचे एक पॅकेट 5 रुपये किमतीला मिळते.
अमेरिकेत पार्ले- जी बिस्किटाची किंमत 1 डॉलर इतकी आहे. साधारण या बिस्किटाची किंमत आपल्याकडे १० रुपये आहे.
पाकिस्तानात पार्ले-जी बिस्कीट ५० रुपयांना विकले जात आहे.
तर दुबईत या बिस्किटाची किंमत 186 रुपये इतकी आहे.