मिक्सरमध्ये बनवा तुपापासून मॉइश्चरायजर? त्वचा उजळेल

थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी पडते. अशावेळी सतत चेहऱ्याला व त्वचेवर मॉइश्चरायजर लावावं लागते.

Mansi kshirsagar
Feb 15,2024


काहीजणांची त्वचा इतकी संवेदनशील असते की त्यांनी काहीही लावलं तरी चेहऱ्यावर किंवा त्वचेवर अॅलर्जी येते.


अशावेळी घरगुती पद्धतीने तुम्ही मॉइश्चरायजर तयार करु शकता. तुपाचा वापर तुम्ही करु शकता.


सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात एक ते दोन चमचे तुप घ्या. नंतर एक चमचा पाणी टाका


हे सर्व मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्या. एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर त्यातील पाणी काढून टाका.


जवळपास सात ते आठ वेळा हिच प्रक्रिया करा. त्यानंतर पूर्णपणे पाणी काढून टाकल्यानंतर क्रीमसदृश्य पेस्ट तयार होईल


ही क्रीम तुम्ही मॉइश्चरायजर म्हणून त्वचेवर लावू शकता. नैसर्गिक पद्धतीने बनवलेले हे मॉइश्चरायजरमुळं त्वचा उजळ होईल.

VIEW ALL

Read Next Story