त्यामुळं प्रत्येक घरात तुळसही आढळली जातेच. हिंदू धर्मात तुळशीला लक्ष्मीचे प्रतिक मानले जाते.
तुळशीच्या रोपाचेही दोन प्रकार आहे. यापैकी कोणती तुळस घरात लावावी? याबाबत जाणून घेऊया.
तुळशीचे दोन प्रकार असतात एक रामा आणि एक श्यामा तुळस. या दोन्ही तुळशींमध्ये एक सूक्ष्म फरक असतो. तोच जाणून घेऊया.
रामा तुळशीचा रंग हिरवा असतो आणि या रोपाची पाने थोडी गोड असतात. त्याचबरोबर त्याचा उल्हासदायक रंग आणि गोड चव यामुळं तिला श्री तुळसदेखील म्हणतात. ही तुळस प्रभू श्रीरामाला खूप प्रिय होती म्हणून तिला रामा तुळस म्हणतात.
श्याम तुळशीचा रंग गडद जांभळा असतो. तसंच. या रोपाची पाने रामा तुळशीइतकी गोड नसतात. तसंच, ही तुळस श्रीकृष्णाला प्रिय होती म्हणून तिला श्यामा तुळसी असंही म्हणतात.
हिंदू धर्मानुसार दोन्हीही तुळशी शुभ मानल्या जातात. मात्र वास्तुशास्त्रानुसार घरात रामा तुळशीचे रोप लावणे सर्वोत्तम मानले जाते. यामुळं घरात समृद्धी आणि सकारात्मक उर्जा निर्माण होते.
श्यामा तुळसदेखील शुभ असते. मात्र, त्याचा जास्तीत जास्त उपयोग औषधी गुणांसाठी केला जातो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)