तुम्ही पाहिलं असेल कि बऱ्याचदा घराच्या भिंतीवर पिंपळाच झाडं उगवतं. याची मूळ खोलवर रुततात आणि भिंतीला तडे देखील जातात.
वास्तुशास्त्रानुसार देखील घराच्या भिंतीवर पिंपळ उगवलेलं चांगलं नाही. यामुळे कुटुंबाला अडचणींचा सामना करावा लागतो.
पिंपळ वृक्ष हे पक्षाच्या विष्ठेतून उगवत, आणि जर त्याला काढलं नाही तर त्याची मूळ ही खोलवर जातात.
ज्योतिशास्त्रानुसार भिंतीवरील पिंपळाच पान काढण्यापूर्वी 45 दिवस त्याची विधिवत पूजा करावी तसेच त्याला पाणी देखील घालावे.
पिंपळ वृक्ष काढण्यापूर्वी भगवान विष्णूंचा जप करावा आणि त्याला नमस्कार करावा.
शक्य झाल्यास भिंतीवरून काढलेला पिंपळ वृक्ष हा योग्य ठिकाणी जमिनीत लावावा.
पिंपळ वृक्ष हा हिंदू धर्मात पवित्र मानला जातो, त्यात भगवान विष्णू आणि अन्य देवीदेवतांची वास असतो असं म्हटले जाते.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)