Spam Calls ने कंटाळलात? फोनमधली ही सेटिंग ऑन करा मिळेल सुटका

Pooja Pawar
Nov 09,2024


फोनवर सतत येणाऱ्या Spam Calls मुळे अनेकजण कंटाळतात. तेव्हा आज यापासून सुटका मिळवण्याची एक सोपी ट्रिक तुम्हाला सांगणार आहोत.

Android फोनमधील सेटिंग :

Android स्मार्टफोनमध्ये एक खास सेटिंग असून याला सुरु करून तुम्ही Spam Calls पासून सुटका मिळवू शकता.


Android स्मार्टफोनमधील ही सेटिंग सर्व यूजर्ससाठी उपलब्ध असते. ही सेटिंग ऍक्टिव्हेट कशी करावी हे पाहुयात.


मोबाईल यूजर्सना फोनमध्ये डायलपॅड ओपन करायचा आणि मग Recent Call या ऑप्शनमध्ये जा.


स्क्रीनच्या वरती डाव्या बाजूला तीन डॉट्स दिसतील त्यावर क्लिक करा. अनेक ऑप्शन पाहायला मिळतील त्यातील एक ऑप्शन 'block spam calls' असा असेल त्यावर क्लिक करा.


block spam calls यावर क्लिक केल्यावर अनेक ऑप्शन उघडतील त्यानंतर Spam Calls या ऑप्शनवर क्लिक करा.


इतर ऑप्शन क्लिक करून तुम्ही रियल इस्टेटच्या जाहिराती आणि टेलिकॉम कंपन्यांकडून येणारे Spam Calls रोखू शकता.


इथे युजर्सला त्यांच्या फोनवर येणारे सर्व अनोळखी कॉल ब्लॉक करण्याचा ऑप्शन असतो.

VIEW ALL

Read Next Story