मुलं अभ्यासाचा कंटाळा करतात, अगदी पळ काठतात..असू शकतात 'ही' 10 कारणे

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Nov 13,2023

शिक्षण

अनेक मुलांना शिक्षणात अजिबात रस नसतो. अभ्यास, शाळा अगदी त्यांना नकोस वाटतं.

मन नसतं

अनेक मुलं अशी आहेत ज्यांना अभ्यास नकोसा असतो. कारण यांना अभ्यास करायला आवडत नाही. आपण अशी कारणे बघणार आहोत ज्यामध्ये मुलं अभ्यासाचा कंटाळा करतात.

इच्छा नाही

अनेक मुलं अशी असतात ज्यांना शिक्षणात इच्छा नसते. नवं काही तरी शिकावं असं काही वाटत नाही. सगळ्याचा कंटाळा येतो.

जास्त अभ्यास

काही मुलांना जास्त अभ्यास करायला लागणार या विचारानेच कंटाळा आलेला असतो.

जास्त भार

काही मुलांना कोणताच भार सहन होत नाही मग तो अभ्यासाचा असो किंवा कामाचा. अशी मुलं अभ्यासाकरता टाळाटाळ करतात.

चुकीच्या गोष्टी

काही मुलांना आजूबाजूच्या चुकीच्या गोष्टींमुळे अभ्यासाचा कंटाळा येतो. जसे की, शिक्षकांचे रागावणे, पालकांची जबरदस्ती.

चिडचिडपणा

काही मुलांना अभ्यासातील अनेक गोष्टी कळत नसल्यामुळे सतत चिडचिड होत राहत. आपल्याला काहीच कळत नाही याचा ताण येतो. यामुळे अभ्यासाचा कंटाळा करतात.

खेळाची इच्छा

काही मुलांची खेळायची इच्छा इतकी स्ट्राँग असते की, त्यापुढे त्यांना काहीच नको असतं. ही मुलं अगदी अभ्यासही टाळतात

अभ्यास

सतत अभ्यास कर, अभ्यास झाला का? यासारख्या पालकांच्या प्रश्नांना मुलं कंटाळतात आणि 'अभ्यास' या शब्दालाच त्यांना कंटाळा येतो.

VIEW ALL

Read Next Story