जोडून आलेल्या सुट्ट्यांची चर्चा

दरवर्षी नव्या वर्षाचं कॅलेंडर हाती पडल्यानंतर पहिल्यांदा चर्चा होते ती जोडून आलेल्या सुट्ट्यांची.

असाच काहीसा प्रकार 2024 बद्दल घडतोय

जोडून आलेल्या सुट्ट्या किती आहेत. रविवार वगळता महिन्यात सुट्ट्या आहेत की नाही हे आपल्यापैकी अनेकजण आवर्जून पाहतात. 2024 ही याला अपवाद नाही.

13 सुट्ट्यांचा महिना

मात्र यंदा 2024 मध्ये एका महिन्यात तब्बल 13 सुट्ट्या आहेत.

18 दिवस काम करुन पूर्ण पगार

म्हणजेच या महिन्यात केवळ 18 दिवस काम करुन पूर्ण महिन्याचा पगार मिळणार आहे.

कोणत्या महिन्यात इतक्या सुट्ट्या?

ज्या महिन्याबद्दल आपण बोलत आहोत तो महिना आहे मार्चचा! या महिन्यात नेमक्या किती आणि कशा सुट्ट्या आहेत पाहूयात...

3 अतिरिक्त सुट्ट्या

मार्च महिन्यामध्ये तशा 3 अतिरिक्त सुट्ट्या आहेत.

सगळ्या सुट्ट्या लाँग विकेण्ड

मात्र 2024 च्या मार्चमधील या तिन्ही सुट्ट्या लाँग विकेण्ड म्हणजेच शनिवार, रविवारला लागून आहेत.

महाशिवरात्रीची सुट्टी

मार्च महिन्यामध्ये महाशिवारात्री आणि महिला दिन एकाच दिवशी आहे. शुक्रवारी 8 मार्च रोजी महाशिवरात्रीची सुट्टी आहे.

3 दिवसांचा प्लॅन

त्यामुळे महाशिवरात्रीला लागून 8 ते 10 मार्च असा 3 दिवसांचा प्लॅन करता येईल.

धुलिवंदनाची सुट्टी

मार्च महिन्याच्या शेवटच्या सोमवारी म्हणजेच 25 तारखेला धुलिवंदनाची सुट्टी आहे.

मोठा प्लॅन करता येईल

त्यामुळे धुलिवंदनला जोडून शनिवार 23 मार्च, रविवार 24 मार्च आणि 25 मार्च असा प्लॅन करता येईल.

29 मार्चलाही सुट्टी

याच आठवड्यामध्ये शुक्रवारी म्हणजे 29 मार्चला गुड फ्रायडेची सुट्टी आहे.

29 ते 31 प्लॅन

त्यामुळे गुड फ्रायडेची सुट्टी 29 ला असल्याने 29 ते 31 असाही प्लॅन करता येईल.

अशा असतील 13 सुट्ट्या

मार्चमध्ये 5 रविवार आणि 5 शनिवार आहेत. मार्चमध्ये 5 डेज विकनुसार 10 शनिवार रविवारच्या आणि 3 अतिरिक्त अशा 13 सुट्ट्या असतील.

VIEW ALL

Read Next Story