स्ट्रॉबेरीमध्ये 91 टक्के पाणी असतं. त्यासोबतच यात अॅन्टीऑक्सीडेंट देखील सगळ्यात जास्त असतात.
संत्र्यात 88 टक्के पाणी असतं. त्यासोबत त्याच फायबर, अॅन्टिऑक्सिडंट्स आणि अनेक पोषक तत्व देखील असतात. ज्यामुळे अनेक आजार होण्यापासून तुमचा बचाव होतो.
टॉमेटोमध्ये 94 टक्के पाणी असतं. त्याशिवाय इतर फळांप्रमाणे यातही अॅन्टिऑक्सिडंट्स हे मोठ्या प्रमाणात असतात. जे हायड्रेशनसाठी खूप फायदेकारक ठरतात.
फ्लॉवरमध्ये पाणी, फायबर आणि पोषक तत्वे मोठ्या प्रमाणात असतात. त्यासोबत ज्यांना डिहायड्रेशनची समस्या आहे त्यांना त्याचा फायदा होता.
काकडीमध्ये 95 टक्के पाणी आणि खूप कमी प्रमाणात कॅलरीज असतात. त्यामुळे तुमची बॉडी ही हायड्रेटेड राहते आणि आरोग्याला खूप फायदे सुद्धा होतात.
पीचमध्ये 89 टक्के पाणी असतं. त्याशिवाय त्यात फायबर आणि अॅन्टिऑक्सीडंट्स मोठ्या प्रमाणात असतात.
कलिंगडमध्ये 92 टक्के पाणी असतं. त्यासोबत कॅलरी देखील कमी असतात, तर दुसरीकडे त्यात फायबर, व्हिटामिन सी, ए मॅग्नेशियमसारखे पोषक तत्व खूप जास्त असतात. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)