अनेकजण घरामध्ये धावणाऱ्या पांढऱ्या घोड्याचे चित्रं लावतात. अशी चित्रं घरात लावणं शुभ मानलं जातं.
पण तुम्हाला हे माहित आहे का, वास्रुशास्त्रानुसार ही चित्रं योग्य दिशेने लावणे आवश्यक असते.
ही चित्रं नेहमी घराच्या दक्षिण दिशेला लावावीत त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.
अशी चित्रं लावण्यासाठी दक्षिण दिशेबरोबरच उत्तर दिशा देखील योग्य मानली जाते. उत्तर दिशेला अशी चित्रं लावल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते.
बेडरूममध्ये कधीही धावत्या घोड्यांचे चित्र लावू नये. यामुळे घरात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असते.
शक्यतो ही चित्रं घराच्या हॉलमध्ये लावावीत. यामुळे घरात सुख शांती नांदते तसेच घराची प्रगती होते, असं म्हटलं जातं.
ही चित्रं खरेदी करताना घोड्याला लगाम नाही आहे याची खात्री करा. याचा थेट संबंध घरातील आर्थिक समस्येशी असतो. मुक्त घोडे असतील तर घरात आर्थिक चणचण भासत नाही. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)