उन्हाळ्यात आपलं शरीर थंड आणि हायड्रेटेड ठेवण्याच्या प्रयत्नात आपण बरेच उपाय शोधत असतो. अशात काही लोक आपल्या आहारात ड्राय फ्रुट्सचा देखील सामावेश करतात.
पण उन्हाळ्यात काही ड्राय फ्रुट्सचं सेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतं. काही ड्राय फ्रुट्समुळे आपल्या शरीराचं तापमान वाढवण्याची शक्यता असते.
हिवाळ्यात हे ड्राय फ्रुट्स आपल्या शरीराला उष्णता पुरवण्याचं काम करतात. पण, उन्हाळ्यात याचे उलट परिणाम होऊ शकतात.
खजूरात भरपूर पोषक तत्वे असून, उन्हाळ्यात त्याचं अतिप्रमाणात सेवन आपल्या शरीराचं तापमान वाढतं. ज्यामुळे जळजळ आणि अपचनासारख्या समस्या होऊ शकतात.
अंजीर मुळात उष्ण फळ असल्यानं त्याच्या सेवनामुळे शरीरातील उष्णतेचं प्रमाण वाढवून तोंडाचे व्रण वाढवू शकतात.
अक्रोड आपल्या शरीरासाठी भरपूर फायदेशीर असतं. त्याबरोबर तो उष्ण पदार्थ असल्यामुळे त्याच्या अतिप्रमाणात सेवनाने आपल्याला तोंडावर पुरळ येणं आणि नाकातुन रक्त येणं यांसारखे त्रास होऊ शकतात.
काजूसुद्धा एक उष्ण पदार्थ असून, त्याचा वापर मिठाई आणि जेवणाची चव वाढवण्यासाठी वापर केला जातो. पण काजूचं अतिप्रमाणात सेवन केल्यास पोटाचे आजार होऊ शकतात.