आयुर्वेदानुसार तुळशीचे रोप हे औषधी वनस्पती आहे. तुळशीच्या पानाचे सेवन केल्याने अनेक आजार दूर होतात.
तुळशीच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, लोह, मँगनीज आणि कॅल्शियमसारखे एंटीऑक्सीडेंट असतात.
तुळशीच्या पानांमध्ये यूजेनॉल असल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
ज्या व्यक्तीला मधुमेहाचा त्रास आहे त्या व्यक्तीने दररोज तुळशीच्या पाने खाल्ली पाहिजेत.
तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने त्वचा सुधारते. आणि तणाव देखील कमी होण्यास मदत होते.
हिवाळ्यात सर्दी-खोकला असेल तर तुळशीच्या पानाचा चहाचे सेवन करा. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)