नातं हे सात जन्माचं असतं, पण जोडीदार योग्य निवडल्यास हे शक्य असतं.
नाहीतर नात्यात कतीही तडजोड केली तरी ते शेवटपर्यंत जात नाही.
दोन्हीपैकी एकही जोडीदार चुकला तर संसार मोडतो. त्यामुळे हे 5 संकेत तुम्हाला सांगतात तुमचा जोडीदार योग्य आहे की नाही.
जर जोडीदार वारंवार खोटं बोलत असेल तुमची फसवणूक करत असेल तर ही नात्यासाठी धोक्याची घंटा असते.
नात्यांचा पाया हा संवाद असतो. जर तुमचा जोडीदार मोकळेपणाने तुमच्याशी संवादही साधू शकत नाही. त्यामुळे तुमचा जोडीदार तुमच्यासोबत खूप कमी वेळ घालवतो. हे योग्य नाही.
नात्यात एकमेकांविषय आदर असणे गरजेच आहे. पण जोडीदार तुमचा वारंवार अनादर करत असेल तर अशा नात्यात राहणे योग्य नाही.
नात्यात छोटे मोठे वाद होतात, पण जोडीदार सतत लहान सहान गोष्टीवरुन भांडत असेल तुम्हाला चुकीच्या गोष्टीसाठी जबाबदार ठरवत असेल तर हे गंभीर समस्या आहे.
जोडीदार तुमच्या विचारांना, आवडीनिवडीला महत्त्व देत नसेल तर तो या नात्यात पूर्णपणे गुंतलेला नाही, हे स्पष्ट असतं.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)