परीक्षा येताच मुलांमधील तणाव वाढतोय का? 'या' गोष्टींची काळजी घ्या

Feb 20,2024


गेल्या काही दिवसात आपण जर पाहिलं तर स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातील विद्यार्थी हे नेहमीचं तणावाखाली अस्तात. त्यामुळे त्यांना तणाव, दोकेदुखी असे आजारल होत अस्ते. त्यांचा मनातील अभ्यासाची भीतीमुळे ते दुसरा कोणताही विचार करत नाही.


स्पर्धा परिक्षेच्यावेळी जर योग्य मार्गदर्शन नसेल, तर बऱ्याचदा कष्टाचे रूपांतर यशात होत नाही. खूप कष्ट करून अभ्यासात पूर्ण वेळ लक्ष घालूनही यश मिळत नसेल, तर नैराश्य येणे साहजिकच आहे अणि यामुळे बऱ्याचदा


परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत जेणेकरून मुलांना परीक्षेचा ताण येऊ नये आणि त्यांचे मानसिक आरोग्यही चांगले राहील. त्यांनी आपल्या मुलांचं मनोबल वाढवलं पाहिजेल.c


परीक्षेच्या काळात ताणतणाव होणे स्वाभाविक आहे, त्यामुळे तुम्हाला चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते आणि तुम्हाला एकाग्र होण्यासही मदत होते, परंतु जास्त ताण आणि परीक्षेची भीती याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात


राज्यात परीक्षा सुरू होत आहेत. मुलांवर चांगले मार्क्स आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळावी यासाठी दबाव असतो, पण प्रत्यक्षात अति ताणामुळे मुलांची मूलभूत कामगिरी क्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे केवळ मुलांनीच नाही तर त्यांच्या पालकांनीही काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.


झोपेच्या बाबतीत तडजोड करू नका, मुलांना परीक्षेच्या वेळी चांगली झोप मिळणे महत्त्वाचे आहे. झोपेच्या कमतरतेमुळे फोकस आणि मेमरीमध्ये समस्या उद्भवू शकतात.


जागृत राहून आणि अभ्यास करताना चहा आणि कॉफीचे जास्त सेवन टाळा. कॉफीमध्ये कॅफेन अस्त ज्यामुळे शरीराला जास्त प्रमाणात त्रास होण्याची शक्यता अस्ते. जास्त कॉफी प्यायल्याने झोप न येणे अशा समस्या उद्भवू शकतात.


दररोज चालल्याने आणि व्यायाम केल्याने शरीर निरोगी व फ्रेश रहाते. सकाळी 15 - 20 मिनिट चालल्यास दिवसभर आपण फ्रे्अश रहातो ज्यामुळे अभ्यासाकडे लक्ष द्यायला मदत होते. परीक्षेदरम्यान मोबाईलपासून अंतर राखणे आवश्यक आहे. स्क्रीन टाइम कमी केल्याने चांगली झोप आणि चांगली कामगिरी होते.


जर तुमच्या मनात काही अडचण, समस्या किंवा नकारात्मक विचार असेल तर ते तुमच्या मित्र आणि पालकांसोबत नक्कीच शेअर करा कारण यावेळी फक्त अभ्यास करून आपल्यामनात नकारातमक विचार येत अस्तात.

VIEW ALL

Read Next Story