'एखादी व्यक्ती तुमच्याशी कावेबाजपणे वागत असेल तर सर्वप्रथम त्यांच्याशी प्रेमान वागा, हे नाही जमल्यास दयाभाव दाखवा आणि अगदीच न जमल्यास त्या व्यक्तीपासून अंतर ठेवा.'
'प्रेमानं त्यांचं मन जिंका. कधीकधी गोंधळ घालणाऱ्यांनीच आखलेल्या मार्गावर चालून त्यांना बदल समजवून द्या. त्यांना विरोध करू न देता फक्त दोन दिवस ते (अशक्य माणसं) म्हणतील तसं करा.'
'काही मतभेद असतील तर त्या व्यक्तीविषयी बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष व्यक्तीशी संवाद साधा. एखादी समस्या अधिक लोकांपर्यंत पोहोचल्यास त्याचे अनेक दृष्टीकोन तयार होतात आणि अडचणी वाढतात... पण, समोरच्या व्यक्तीची बाजू समजून घेणंही महत्त्वाचं.'
'क्रोध वाढला तर तो व्यक्त करू नका. त्या ठिकाणहून निघा. एकट्यानं बसून आत्मचिंतन करा- अम्मा'
'तुमच्यावर कोणाचं प्रेम आहे किंवा कोण तुमचा राग करतो यामुळं तुमच्यावर फारसा फरक पडत नाही. जर तुम्ही स्वत:शी खरे आहात तर तुम्ही आहात तसेच राहाल आणि जर तुम्ही तसे नाही आहात तर मात्र कोणीही येऊन तुमचा स्वभाव बदलून जाऊ शकतो.'
'त्यांच्या वागण्यामध्ये स्वत:ला अडकवून घेऊ नका किंवा त्यांना सुधारण्यासही जाऊ नका. शांततेनं परिस्थितीला सामोरं जा.'
'दयाभावना आणि सहनशीलता ही कमकुवत असण्याची चिन्हं नसून, खंबीर व्यक्तीमत्त्वाची प्रतीकं आहेत.' (सर्व छायाचित्र- फ्रीपिक)