जास्त प्रमाणात बटाटा खाल्याने होऊ शकतं 'हे' नुकसान
बटाट्याचा उपयोग बहुतेक वेळा भाज्यांमध्ये केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का बटाट्याचे जास्त सेवन धोकादायक ठरू शकते.
बटाट्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास वजन वेगाने वाढते. बटाट्यामध्ये असणारे कार्बोहायड्रेट वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात.
बटाट्याच्या अती सेवनामुळे रक्तातील साखरेच प्रमाण वाढून 'डायबिटीज' सारख्या व्याधी उद्भवतात.
अधिक प्रमाणात बटाट्याचे सेवन केल्यास पचनासंबंधित विकार होऊ शकतात. बद्धकोष्ठता , उलट्या आणि धाप लागणे यांसारख्या समस्या होऊ शकतात.
उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी कमी प्रमाणात बटाट्याचे सेवन करावे.
सांधेदुखीचा त्रास असल्यास बटाटे खाणे टाळावेत.