तुम्हीसुद्धा सकाळी उठण्यासाठी अलार्म सेट करता का ? पण तुम्हाला माहित आहे का असे केल्याने तुमच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.
अनेकवेळा असे होते की आपल्याला उठायचं 6 वाजता असतं आणि आपण 5 ते 6 असे सलग अलार्म लावतो.त्यामळे अलार्म पुन्हा पुन्हा वाजत राहतो.
हे अशा लोकांद्वारे केले जाते ज्यांना एका अलार्मधून जाग येत नाही. पण ज्यावेळी अलार्म सतत वाजत राहतो त्यावेळी तुमची झोपमोड होते.
एका संशोधनातून असे समोर आले की,असे केल्याने तुम्हाला दिवसभर थकवा जाणवू शकतो.
एकाचवेळी अनेक अलार्म सेट केल्याने झोपेवर नकारात्मक परिणाम होतो आणि मेंदू कमकुवत होतो.
तसेच प्रत्येक वेळी अलार्म वाजला की झोप भंग पावते आणि याचा परिणाम स्मरणशक्तीवर होतो . त्याचबरोबर सर्जनशीलता सुद्धा कमी होते.
रात्री झोपण्याआधी वेळ निश्चित करून झोपल्यास सकाळी उठण्यास एक अलार्म पुरेसा आहे.
झोपेत व्यत्यय आल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात ,जसे की समजून घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)