मंगळवारी अंगारकी चतुर्थी आहे. अंगारकी चतुर्थी ही वर्षातून दोनदा येते. अंगारकी चतुर्थीला बाप्पाला नैवेद्य दाखवला जातो. अशावेळी झटपट होणारे तळणीचे मोदक करुन पाहा.
गव्हाचे पीठ, बारीक रवा, तेलाचे मोहन, खोबऱ्याचा चव, खसखस, पिठीसाखर, वेलची पूड, सुका मेवा, बेदाणे, तेल
सगळ्यात आधी गव्हाचे पीठ, रवा आणि मीठ घालून घट्टसर कणीक भिजवून घ्या. पीठ भिजवताना त्यात गरम तेलाचे मोहन घालावे.
त्यानंतर एका पॅनमध्ये खोबऱ्याचा चव चांगला खरपूस भाजून घ्यावा. त्यानंतर त्यात साखर, वेलची पूड आणि सुकेमेवा घालून एकजीव करुन घ्या.
खोबऱ्याचे सारण तयार झाल्यानंतर कणकेच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटायला घ्या
पुऱ्या लाटून झाल्यानंतर त्यात सारण भरुन त्याला पाकळ्या करुन घ्या आणि मोदक बनवा
कढाईत तेल गरम झाल्यानंतर मोदक तळून घ्या. लालसर रंग येईपर्यंत मोदक तळून घ्यावे