बापरे! दात घासण्याचा थेट कॅन्सरशी संबंध; धक्कादायक खुलासा, वेळीच सावध व्हा

लाखोंच्या संख्येनं बॅक्टेरिया

आपल्या तोंडात लाखोंच्या संख्येनं बॅक्टेरिया असतात. यापैकी काही आपल्यासाठी फायद्याचे तर काही हानीकारक असतात.

नुकसान टाळता येतं

नियमित ब्रश केल्याने हानीकारक बॅक्टेरियांमुळे होणारं नुकसान टाळता येतं. म्हणजेच मैखिक आरोग्य उत्तम ठेवून आजारांपासून दूर राहता येतं.

बॅक्टेरियाची वाढ

आपण ब्रश केला नाही म्हणजेच दात घासले नाही तर उरलेले अन्नाचे कण हे हानीकारक बॅक्टेरियाची वाढ होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करतात.

विषाणूंचा शिरकाव

दात न घासल्यास तुमच्या दातांवर तुम्हाला एखादा चिकट स्राव असल्यासारखं वाटत राहतं. हे असं वाटणं म्हणजेच विषाणूंनी उरलेल्या पदार्थांच्या माध्यमातून तुमच्या तोंडात घर केलं आहे असं समजावं.

होऊ शकतात या समस्या

दात घासण्यात सातत्य न ठेवल्यास मैखिक स्वच्छतेकडे दूर्लक्ष केल्यास हिरड्यांना सूज येणे, हिरड्या लाल पडणे, हिरड्या दुखणे यासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं.

दातही गमावावे लागू शकतात

दात न घासल्याने होणाऱ्या हिरड्यांच्या दुखण्याकडे दूर्लक्ष केल्यास तुम्हाला तुमचे दातही गमावावे लागू शकतात.

कॅन्सरचा संबंध

दाड दुखणे आणि कॅन्सरचा संबंध असल्याचं नुकत्याच केलेल्या अभ्यासामध्ये समोर आलं आहे. खास करुन जठराचा आणि अन्ननलिकेचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.

परिणामकारक मार्ग

यावर कॅन्सरसंदर्भातील धोक्याबद्दल सध्या संशोधन सुरु असलं तरी नियमित दात घासणे हा अधिक सोपा आणि परिणामकारक मार्ग आहे हे निश्चित.

कॅन्सरचा धोका वाढतो

दात न घासल्यास तोंडातील घातक बॅक्टेरिया अगदी पोटापर्यंत जातात आणि तिथे या विषाणूंमुळे इन्फेक्शन होऊन कॅन्सरचा धोका वाढतो, असं प्राथमिक अभ्यासात दिसून आळं आहे.

सर्वात सोपा मार्ग

मौखिक आरोग्य आणि कॅन्सर यावर संशोधन सुरु असलं तरी कोणत्याही स्थितीत तोंडाची स्वच्छता कायम ठेवणे हा सर्वात सोपा मार्ग आहे हे निश्चित.

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

VIEW ALL

Read Next Story