आंबा खाल्यानंतर चुकूनही खाऊ नका 'या' 5 गोष्टी, अन्यथा...

Diksha Patil
May 14,2024

दही

हे कॉम्बिनेशन खूप आवडतं पण ते आरोग्यासाठी चांगलं नाही. आंबा गरम असतो आणि दही थंड त्यामुळे त्यांना एकत्र खाल्यानं जळजळ, गॅस किंवा अपचनची समस्या होऊ शकते.

तिखट खाणं

आंब्यासोबत जर तुम्ही काही तिखट खाल्लं, तर पचनासंबंधीत समस्या उद्भवू शकतात.

पाणी

आंबा खाल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. त्यामुळे पचन क्रियेवर परिणाम होतो. आंबा खाल्ल्याच्या अर्ध्या तासानंतर पाणी प्या.

कोल्ड ड्रिंक्स

आंबा आणि कोल्ड ड्रिंक्स दोघांमध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. त्याचे एकत्र किंवा मागे-पुढे सेवन केल्यानं अचानक ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते.

कारलं

आंबा खाल्यानंतर कारल्याचे सेवन चुकूनही करु नये. आयुर्वेदानुसार, या दोघांचे एकत्र सेवन केल्यानं मळमळ होणं किंवा उलटी होण्याची शक्यता असते.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story