सुका मेवा आपण रोज खायला हवा त्याचे आरोग्याला अनेक फायदे असतात.
पण काही ड्राय फ्रुट्स असे आहेत. जे सकाळी खायला नको, त्यानं तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. चला तर त्याविषयी जाणून घेऊया
सकाळी-सकाळी खजूर खायला नको. त्यानं पचनासंबंधीत समस्या होतात.
आलु बुखार सकाळी सकाळी चुकूनही खाऊ नये. सकाळी सकाळी खाल्यानं पोटा संबंधीत समस्या उद्धभवतात.
सकाळी सकाळी रिकाम्या पोटी अंजीर खाऊ नका. त्याचं कारण त्यात फायबर मोठ्या प्रमाणात असतात. त्यानं ब्लोटिंग आणि पचन संबंधीत समस्या उद्भवतात.
सकाळी मनुके खाल्यानं डायबिटीज होण्याची शक्यता असते. त्याशिवाय दात देखील खराब होऊ शकतात. त्यामुळे कंट्रोलमध्ये खा. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)