पावसाळ्यात घरात आर्द्रता वाढली आहे? तर या '5' टिप्स करा फॉलो

Jul 02,2024


उन्हाळ्यातील गरमी नंतर पावसाळा हा सर्वांनाच हवाहवासा वाटत असतो. पण पावसाळ्यात आर्द्रतेची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते.


जर तुम्हालासुद्धा घरातील आर्द्रता दूर करयाची आहे तर या '5' टिप्स करा फॉलो .

एक्झॉस्ट फॅनचा वापर

पावसाळयात जर रूममधील आर्द्रता वाढली असेल तर एक्झॉस्ट फॅनचा वापर करणं फायदेशीर ठरतं.

व्हेंटिलेशन

पावसाळ्यात घरात पुरेशी हवा खेळती नसल्यास घरात ओलावा निर्माण होऊ शकतो.अशावेळी पाऊस नसताना पंख्याचा वापर करणे किंवा दार खिडक्या उघडे ठेवावेत. ज्यामुळे हवा खेळती राहते.

पुरेसा सु्र्यप्रकाश

पावसाळा असा ऋतू आहे की त्यावेळी सुर्यप्रकाश कमा असतो. त्यामुळे जेव्हा बाहेर सूर्यप्रकाश असतो तेव्हा घराचे सर्व पडदे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात ज्यामुळे घरात आर्द्र वातावरण तयार होत नाही.

कमी प्रकाशाचा वापर

आर्द्रता कमी करण्यासाठी तुम्हाला प्रकाशाकडे देखील लक्ष देणे सुद्धा गरजेचे आहे. पावसाळ्यात लाइटचा वापर कमी करावा.

ओले कपडे

पावसाळ्यात लवकर कपडे सुकत नाही. त्यामुळे आपण घरामध्ये कपडे सुकवण्याचा प्रयत्न करतो.पण यामुळे देखील आर्द्रता वाढते.

VIEW ALL

Read Next Story