असे अनेक भारतीय क्रिकेटपटू आहेत ज्यांना मांसाहार सोडला आहे.
काही भारतीय खेळाडूंना आरोग्यासाठी तर काहींनी चक्क अध्यात्मिक कारणामुळे मांसाहार सोडलाय.
स्वत:वर नियंत्रण ठेवत वेगवेगळ्या कारणांसाठी मांसाहार सोडणारे हे भारतीय खेळाडू कोण आहेत ते पाहूयात...
ईशांत शर्माला अंडर 19 संघात असल्यापासूनच चिकनबद्दल विशेष प्रेम होतं. मात्र वेगवान गोलंदाज होण्यासाठी त्यांने मांसाहार सोडला.
वारंवार दुखापतींना तोंड देणाऱ्या हार्दिकने आरोग्याचा विचार करुनच शाकाहारी होण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं.
2020 पर्यंत चहल मांसाहार करायचा. मात्र त्याने चार वर्षांपूर्वी मांसाहार सोडला.
मात्र 2020 मध्ये त्यानेच आपण आता केवळ शाकाहारी भोजन घेतो असं सांगितलेलं.
रोहित शर्मा फिटनेसवरुन कायमच टीकेचा धनी ठरल्याचं पाहायला मिळालं आहे.
रोहित शर्माने मांसाहार सोडला आहे. मात्र तो अंड्याचं नियमित सेवन करतो.
एकेकाळी बटर चिकन म्हणजे जीव की प्राण असावं इतकं विराट कोहलीला मांसाहारी खाणं आवडायचं.
कोहलीने फिट राहण्याच्या उद्देशाने 2018 पासून मांसाहार सोडला.
अध्यात्मिक गुरुची दिक्षा घेतल्यानंतर धवनने 2018 नंतर मांसाहार सोडला.