शिळ्या पोळ्या उरल्यानंतर त्याचं काय करायचं हा प्रश्न अनेकांना पडतो. आज आम्ही तुम्हाला शिळ्या पोळ्यांपासून आज भन्नाट रेसिपी सांगणार आहोत.
शिळ्या पोळ्यांपासून तुम्ही मस्त कुरकुरीत डोसा तयार करु शकता. त्याची झटपट रेसिपी वाचा
सगळ्यात आधी शिळ्या पोळींचे बारीक बारीक तुकडे करुन घ्या.
एक वाटी दही किंवा ताक घालून एकजीव करुन घ्या. पोळ्या ताकात पूर्णपणे भिजल्या पाहिजेत.
आता या मिश्रणात चिमूटभर साखर घालून दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवा.
आता या मिश्रणात एक वाटी रवा घालून हे सर्व मिश्रण मिक्सरमधून वाटून घ्या. आवश्यकतेनुसार पाणी घाला.
डोश्याचे पीठ तयार होईल या पद्धतीने त्यात पाणी टाका. त्यानंतर चवीनुसार मीठ व अर्धा चमचा सोडा टाका.
आता तवा गरम करुन त्याला आधी तेल लावून घ्या. त्यानंतर शिळ्या पोळीपासून बनवलेलं डोशाचे बॅटरने डोसे काढायला घ्या