पावसाळ्याच्या दिवसात गरमा गरम भजी खाणं प्रत्येकालाच आवडते
या दिवसांत मका मोठ्या प्रमाणात मिळतो. मक्याची कुरकुरीत कॉर्न भजी कशी बनवायची पाहा
मका, कोथिंबीर, चाट मसाला, मिरचीपूड, हळद, मीठ, बेसन
मका उकडून त्याचे दाण काढून घ्या. नंतर त्यात कोथिंबीर, चाट मसाला, मिरचीपूड, हळद, मीठ आणि बेसन टाका
सर्व साहित्य एकजीव करुन घ्या व आता छोट्या आकाराचे गोळे करुन घ्या
आता एका कढाईत तेल गरम करुन घ्या आणि तेलात या भज्या तळून घ्या
भजीला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या यामुळं भजी छान कुरकुरीत होते.