किचनमध्ये वेगवेगळ्या प्रकारची भांडी वापरली जातात. काही विशिष्ट्य पदार्थ करण्यासाठी तशी भांडी आणली जातात.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत लोखंडी भांड्यामध्ये काही पदार्थ शिजवणे हानिकारक ठरु शकते.
लोखंडी भांड्यात कोणते पदार्थ शिजवू नयेत हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
टोमॅटो अॅसिडयुक्त असते लोखंडाच्या कढाईत शिजवल्यानंतर ते लोखंडासोबत मिसळलं जातं आणि पदार्थाची चव बिघडते
पालकाच्या भाजीत ऑक्सालिक अॅसिड असते आणि जेव्हा पालक लोखंडी पातेल्यात शिजवले जाते तेव्हा त्याचा नैसर्गिक हिरवा रंग उडून जातो आणि भाजी काळी होते.
लोखंडी कढाईत ऑम्लेट किंवा अंडा करी बनवू नका. कारण ते कढाईत चिकटतात व त्यासाठी मग भरपूर तेलाचा वापर करावा लागतो
लोखंडी भांड्यात आम्लयुक्त पदार्थ केल्यास भांड्याचा वास त्या पदार्थामध्ये उतरतो हे शरिरासाठी हानिकारक ठरते.