भारतात तुम्हाला विविध समुदायाच्या वेगवेगळ्या परंपरा, रिती रिवाज पाहायाल मिळतात.
भारतातील बहुतांश भागात लग्नानंतर मुलगी सासरी जाते.
पण भारतात असाही एक भाग आहे, जिथे मुलगा लग्नानंतर सासरी जातो.
भारतातील नॉर्थ इस्टमध्ये काही आदिवासी जमाती राहतात. त्यांच्यात हा रिवाज मानला जातो.
विशेषत: मेघालय राज्यात ही प्रथा मानणारा खासी समुदाय आहे.
खासी समुदायातील परंपरेनुसार लग्नानंतर मुलगा मुलीच्या घरी जातो.
घरात लहान मुलगी असेल तर लग्नानंतर जावई सासऱ्यांच्या घरी येतो.
पण काही घरात सरसकट सर्वच मुलींच्या घरी त्यांचे नवरे येतात.
भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत मेघालयमध्ये मुलींचे शिकण्याचे प्रमाण जास्त आहे.