15 ऑगस्टच्या दिवशी दरवर्षी मुलांसाठी शाळेत कार्यक्रम आयोजित केले जातात. ज्यामध्ये तिरंगामधील कोणत्याही रंगाचे किंवा काहीतरी वेगळं असं करून यायल सांगितलं जातं.
तुम्हीसुद्दा तुमच्या मुलांना तयार करण्यासाठी इंटरनेटवर काही शोधत आहात तर या कल्पना नक्की ट्राय करा.
जर तुम्हीही तुमच्या मुलांना स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ध्वजाच्या रंगात रंगवण्याचा विचार करत आहात परंतु कसं तयार करावं हे समजत नसेल तर या सोप्या कल्पना वापरून तुम्ही असा लूक करू शकता.
आजकाल सगळीकडेच अशा प्रकारचा मेकअप केला जात आहे.ज्यामध्ये गालावर केशरी, पांढरा आणि हिरव्टया रंगाच्या जोडलेल्या रेषा बनवल्या जातात आणि मध्यभागी निळा ठिपका देऊन अशोक चक्र बनवले जाते. अशा प्रकारचा मेकअप तुम्ही करू शकता.
या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मुलींना सजवण्यासाठी तुम्ही ध्वजाच्या रंगाचे कपडे, हेअरबँड, रिबन किंवा रबरचा वापर करू शकता. त्याचबरोबर तुम्ही तिरंग्याच्या साडीन किंवा ड्रेस घालून भारत माता सुद्दा बनवू शकता.
तुम्ही तुमच्या मुलीच्या नखांना तिरंगाच्या रंगाचं नेलपेंट लावू शकता.
जर तुमच्या मुलीला मेकअपची आवड असेल तर तिच्या डोळ्यांवर तिरंगाच्या रंगाचे आयशॅडो लावा.
लहान मुलांना मेकअप करताना अशी घ्या काळजी रंगांचा वापर करताना कमी प्रमाणात रंगाचा वापर करा. यामुळे मुलांना खाज सुटणे किंवा कोणत्याही प्रकारची समस्या जाणवत असेल तर लगेच चेहरा धुवा. सर्वोत्तम पर्याय म्हणजे नैसर्गिक रंग वापरा .