अंडरगार्मेंटमध्ये लपवून खाल्ली चपाती, आत्महत्येचा प्रयत्न; आज आहे IAS अधिकारी

आदिवासी कुटुंबातून आहेत

सविता प्रघान या मध्य प्रदेशच्या मंडी गावातील एका आदिवासी कुटुंबातील आहेत. तर 10 वी पर्यंत शिक्षण पूर्ण करणाऱ्या त्यांच्या गावातील त्या पहिल्या महिला आहेत.

मुलीच्या स्कॉलरशिपचे पैसे मिळावे म्हणून केलं अॅडमिशन

सविता यांच्या आई-वडिलांना त्यांच्या स्कॉलरशिपमधून पैसे मिळू शकतात. त्यामुळे त्यांना घरापासून लांब असलेल्या 7 किलोमीटर लांब असलेल्या शाळेत प्रवेश केला. तिथेच 12 वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं

16-17 व्या वयात लग्न

सविता यांचं 16-17 व्या वयात त्यांच्या इच्छे विरोधात लग्न झालं. त्यानंतर सासरच्यांकडून त्यांना खूप त्रास देण्यात आला.

नवऱ्याकडून मारहाण

सविता यांच्यावर एक अनेक निर्बंद होते. त्या हसू किंवा बोलू शकत नव्हता. त्यांचा नवरा त्यांना मारहाण करायचा.

अंडरगार्मेंट्समध्ये ठेवल्या चपात्या

त्यांच्या सासरी एकदा जेवण संपल्यावर पुन्हा जेवण बनवलं जात नव्हतं. त्यामुळे त्यांनी अनेकदा अंडरगार्मेंट्समध्ये चपात्या लपवून बाथरुममध्ये जाऊन खायच्या.

आत्महत्येचा प्रयत्न

त्यांना खूप मारहान झाली अखेर दोन मुलं असतानाही सविता यांनी गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सासूनं त्यांना असं करताना पाहिलं आणि काही न बोलता तिथून निघून गेल्या.

सोडलं सासर

गळफास घेत आत्महत्या करण्याचा विचार सोडून त्यांनी सासर सोडलं आणि पार्लरमध्ये काम करु लागल्या.

शिक्षण केलं पूर्ण

पार्लरमध्ये काम करत करत त्यांनी इंदोरच्या यूनिवर्सिटीमधून पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टरची डिग्रीचं शिक्षण केलं.

पहिल्याच अटेम्पटमध्ये झाल्या आयएएस

शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी यूपीएससी ही सिव्हिल सेवा परिक्षा दिली आणि त्या आयएएस अधिकारी झाल्या. त्यानंतर त्यांनी हर्ष राय गौरशी दुसरं लग्न केलं.

VIEW ALL

Read Next Story