अनेकदा जेवण बनवत असताना स्टीलच्या तव्यावर पदार्थ चिकटून बसतो.
पदार्थ तव्याला चिकटला की त्याची चवही बिघडते आणि तवादेखील खूप खराब होतो. त्यामुळं गृहिणींची कधीकधी चिडचिड होते.
पण या टिपमुळं तुम्ही तुमचा साधा स्टीलचा तवाही नॉनस्टीक करु शकता.
स्टील पॅन नॉनस्टीक बनवण्यासाठी सर्वात पहिले पॅन गरम करुन घ्या.
तवा चांगला तापल्यानंतर त्यावर थोडेसे पाणी छिडका. पाण्याचे थेंब त्यावर दिसले तर तवा चांगला तापला असल्याचे समजावे.
त्यानंतर गरम तव्यावर थोडेसे तेल टाका व टिश्यू पेपरच्या मदतीने संपूर्ण तव्यावर लावून घ्या.
आता तुमचा साधारण स्टीलचा तवाही नॉनस्टिक पॅन झाला आहे. आता त्यावर पदार्थ अजिबात चिकटणार नाही