पावसाळा सुरू झाला की सगळ्याची काळजी घ्यावी लागते. मग ते लहान मुलांची काळजी घेणे असो की घरातील धनधान्य.
बहुतेक वेळा पावसाळ्यात धान्यांना कीड लागते. अशावेळी आपण बरेच घरगुती उपाय करतो
अनेकदा घरात असलेल्या डाळींना बुरशी किंवा कीड लागते. अशावेळी त्यांना मोहरीचे तेल लावले तर डाळ बऱ्याच कालावधीपर्यंत टिकते.
ज्या पोत्यात किंवा डब्यात धान्य ठेवलं आहे त्यात आवश्यकतेनुसार लवंग लसूण टाकल्यास धान्याला बुरशी लागत नाही.
कडुलिंबाला असलेल्या उग्र वासामुळे धान्याला कीड लागत नाही.
धान्यांना कीड लागू नये म्हणून बऱ्याचवेळा संपूर्ण लसूण साल न काढता टाकावा. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)