शूजमधून दुर्गंध येतोय? मग लगेच करा 'हे' उपाय

शूजांना खराब वास येत असेल तर आपले शूज आणि इनसोल नियमितपणे धुवा. हे धुण्यासाठी थंड पाण्याचा वापर करा.

ज्या लोकांच्या चपलांना दुर्गंधी येते त्यांनी स्वत:चे शूज थंड आणि सावलीच्या ठिकाणी ठेवावे. त्यामुळे बॅक्टेरियांची वाढ होत नाही.

जर तुमच्या पायला वारंवार घाम येत असेल तर Deodorant लावा. यामुळे तुमचे पाय कोरडे राहतील.

शूज घालताना कायम मोजे वापरा. मोजे वापरताना ते कॉटनचेच असावेत याची काळजी घ्या.

शूजचा वास दूर करण्यासाठी त्यात लॅव्हेंडर ऑइलचे काही थेंब टाका.

तांदूळ धुतल्यानंतर त्याचे पाणी टाकून न देता, ते पाणी जमा करा. त्या पाण्यात पाय बुडवून बसा. त्यामुळे पायाची दुर्गंधी दूर होईल.

संत्री किंवा लिंबाची साल रात्रभर शूजमध्ये टाकून ठेवा. सकाळी घालण्यापूर्वी ते साल काढून टाका.

VIEW ALL

Read Next Story