देवगड हापूस आणि कर्नाटकी आंब्यातला फरक कसा ओळखावा?

May 10,2024


देवगड हापूस आंब्याची साल ही कर्नाटकी आंब्याच्या तुलनेत पातळ असते. कर्नाटक हापूसची साल जाड असते.


देवगड हापूस आंबा 15 एप्रिल ते 31 मेपर्यंत बाजारात मिळतो. कर्नाटकी हापूस आंबा बाजारात लवकर येतो आणि उशीरापर्यंत असतो.


देवगड हापूस हा गोलाकार आंबा असतो तर कर्नाटक हापूर आंबा आकाराने उभट असतो.


देवगड हापूस आंबा तोंडाशी केशरी आणि लालसर असतो. कर्नाटक हापूस आंबा पिवळसर आणि खालच्या बाजूला हिरवा असतो.


देवगड हापूस आंब्याला थोड्या दिवसांनी सुरकुत्या पडतात तर कर्नाटक आंबा हा कडक असतो.


देवगड हापूसला कोणत्याही प्रकारची सालीला चकाकी नसते तर कर्नाटक हापूस आंबा हा चमकदार असतो.


देवगड हापूस आंबा केशरी रंगाचा असतो तर कर्नाटक आंबा हा कापल्यावर पिवळसर असतो.


देवगड हापूस घरी आणला की, सगळीकडे घमघमाट असतो तर कर्नाटक आंब्याला सुगंध येत नाही.

VIEW ALL

Read Next Story