चहानंतर कॉफी पिणाऱ्यांची संख्या भारतात सर्वात जास्त आहे.
कॉफी प्यायल्याने मूड फ्रेश होतो आणि डिप्रेशन, स्ट्रेसची समस्या दूर होते.
कॉफी शॉप, रेस्टोरंटमध्ये मिळणाऱ्या कॉफीची चव, फ्लेवर आणि टेक्सचर अगदी परफेक्ट असतं.
परंतु घरी कॉफी करताना तशी चव, फ्लेवर आणि टेक्सचर येत नाही.
उकळत्या दुधात घालून कॉफी बनवावी किंवा एका कपमध्ये एक चमचा कॉफी आणि साखर घालून थोडे पाणी किंवा दूध घालून ढवळावे. त्यात गरम दूध घातल्याने भरपूर फेस तयार होतो. त्यावर चॉकलेट पावडर टाकू शकता.
परफेक्ट कॉफी बनवण्यासाठी 1 कप दुधात एक चमचा कॉफी पावडर टाका. जर तुम्ही खूप गोड चहा किंवा कॉफी पीत नसाल तर अर्धा चमचा साखर आणि चिमूटभर चॉकलेट पावडर घाला.
कोमट दुधात कॉफी नीट विरघळत नाही आणि चवही चांगली येत नाही. तेव्हा धाला उकळी आली की त्यात कॉफी, साखर घाला आणि कॉफीला 2-3 मिनिटे मंद आचेवर उकळू द्या.
कॉफी प्यायला आवडत असले तरी ती दिवसातून केवळ 2 वेळाच कॉफीचे सेवन करावे असा सल्ला तज्ज्ञ देतात.