भेंडीची तीच ती रेसिपी खावून कंटाळलात का. तर आता भेंडीची ही नवीन रिसेपी ट्राय करुन पाहा
कुरकुरीत भेंडी कशी करायची याची रेसिपी वाचा
भेंडी, चण्याचे पीठ, तांदळाचे पीठ, कॉर्नफ्लोअर, लाल तिखट, लिंबाचा रस, हळद, मीठ
भेंडी मधोमध 4 बारीक भागांमध्ये चिरुन घ्या. आता एका भांड्यात चिरलेली भेंडी घ्या
त्यात बेसन, तांदळाचे पीठ, कॉर्न फ्लोअर, लाल तिखट, हळद, मीठ, लिंबू टाकून एकजीव करुन घ्या.
आता एका कढाईत तेल गरम करुन घ्या. तेल तापल्यानंतर त्यात भेंडीचे काप सोडा
भेंडी सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. आता त्यावर चाट मसाला टाका. कुरकुरीत भेंडी तयार