गाडीचा प्रवास सुरू करण्यापूर्वी 1 ते 2 तास आधी प्रवासाची गोळी घ्या.
कोणतही गोळी घेण्याआधी डॉक्टरांच्या सल्ला घ्या.
कारमध्ये बसण्यासाठी योग्य सीट निवडा. अशा ठिकाणी बसा जिथे तुमच्या शरीराला कमी हालचाल आणि त्रास जाणवेल. यासाठी पॅसेंजर सीट योग्य जागा आहे.
प्रवासादरम्यान, शक्य तितकी फ्रेश हवा घ्या, गाडीच्या खिडक्या शक्य असेल तेव्हा उघड्या ठेवा. यामुळे कारमध्ये खेळती हवा राहेल.
कारमध्ये पुस्तके वाचणे, मोबाईल घेणे टाळा आणि खिडकीतून दूरच्या गोष्टींकडे पाहा.
प्रवासादरम्यानमध्ये थांबून ब्रेक घ्या. संपूर्ण प्रवास सलगपणे कव्हर करू नका.
प्रवासापूर्वी किंवा प्रवासादरम्यान अती जेवण करणं टाळा, सोबत तेलकट, तुपकट मसालेदार पदार्थ खाणं टाळा. त्याऐवजी साधं अन्न आणि ते ही कमी प्रमाणात खा.