लसूण सोलल्यानंतर ती सालं तुम्ही फेकून देत असाल, तर आत्ताच थांबा.
या सालींचा वापर करुन तुम्ही घरात घुसलेल्या पाली, झुरळांना पळवून लावू शकतो.
लसणांच्या सालींचा वापर करुन तुम्ही एक मॅजिक स्प्रे तयार करु शकता.
लसणाची सालं एका डब्यात जमा करा. त्यानंतर त्यात कडुलिंबाचा पाला टाका
कडुलिंबाचा पाला व लसणाच्या साली एका भांड्यात घेउन त्या गरम पाण्यात उकळवा
चांगलं उकळल्यानंतर त्यात मिरचीचे देढ टाकून पुन्हा उकळी काढा
आता हे पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये टाकून. घरात जिथे पाली-झुरळांचा वावर आहे तिथे मारा