रिलेशनशिप कितीही मजबूत असलं तरीही त्यामध्ये वाद निर्माण होतात. पती-पत्नीमध्ये मतभेद होतातच अशावेळी रागीट पत्नीला कंट्रोलमध्ये कसे ठेवाल, याच्या टिप्स जाणून घ्या?
पत्नी जर भयंकर रागावली असेल तर तिच्या रागावण्याचे कारण सर्वात पहिलं जाणून घ्या. रागावण्याचं कारण योग्य वाटत असेल तर समजावण्याचा प्रयत्न करा.
काही वेळेला पत्नीच्या रागाकडे दुर्लक्ष देखील करायला हवं. कारण जर रागावण्याचे कारण चुकीचे असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणे देखील तितकेच फायद्याचे ठरते.
अनेकदा पत्नीचा अबोला दूर करण्यासाठी मुलांची मदत घ्यावी लागते. मुलांसमोर वाद करणे पत्नी टाळते.
अनेक महिलांचे रागावण्याचे कारण असते पतीने वेळ न देणे. अशावेळी नवऱ्याने पत्नीला वेळ द्यावा. जेणेकरून तीचा राग कमी होईल.
महिला आपलं सर्वस्व पणाला लावतात अशावेळी पतीने पत्नीला आराम द्यावा. तिच्या हातातील कामे करावीत किंवा तिला डेटवर घेऊन जावं.
प्रत्येक महिलेला शॉपिंग आवडते. अशावेळी तुमच्या पत्नीचा राग कंट्रोलमध्ये करायचा असेल तर शॉपिंग हा उत्तम पर्याय आहे.