रागीट मुलांना शांत करण्यासाठी त्यांच म्हणणं शांतपणे ऐका
मुलं चिडल्यावर अनेकदा पालक देखील वैतागतात. पण असं न करता पालकांनी त्यांना काय बरोबर काय चुकीचे हे सांगा.
अनेक मुलं घरातल्या घरात राहूनही चिडचिड करतात. अशावेळी या मुलांना मोकळ्या वातावरणात फिरायला घेऊन जा. त्यांच्यासोबत काही गेम्स पालकांनी खेळावेत.
अनेकदा पालकांना मुलांसाठी कमी वेळ मिळतो. त्यामुळे देखील मुलं चिडचिड करतात. यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत वेळ घालवा.
अनेकदा मुलांना पालकांकडून आपलं कौतुक ऐकायचं असतं. त्यामुळे पालकांनी न चुकता मुलांचं कौतुक करा.
अनेकदा मुलांना देखील कळत नाही ते का चिडचिड करतात. अशावेळी मुलांची भावना समजून घेणे गरजेचे आहे.