लोखंडी भांडी स्वच्छ करणे हे खूप कष्टाचे काम असते. लोखंडीचा कढाई सतत वापरुन काळी होते.
सतत वापरुन कढाईवर तेलाचा चिकट थर साचतो. त्यामुळं हा चिकटपणा काढण्यासाठी खूप मेहनत करावी लागते.
लोखंडी कढाई स्वच्छ करण्यासाठी तुम्ही किचनमधल्याच दोन वस्तु वापरुन ती लख्ख स्वच्छ करु शकता.
लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा याचा वापर करुन तुम्ही कढाई स्वच्छ करु शकता.
काळी झालेल्या कढाईत पाणी भरुन गॅसवर तापत ठेवा. पाण्यात 1-2 चमचे लिंबाचा रस आणि 1 चमचा बेकिंग सोडा टाका
हे पाणी 2-3 मिनिटांसाठी चांगले उकळू द्या. त्यानंतर गॅस बंद करुन टाका
पाणी फेकून देऊन साबणाने किंवा स्क्रबरच्या मदतीने कढाई घासून घ्या. यामुळं कढाई लख्ख चमकेल