आपल्या दैनंदिन आहाराची काळजी घेणे आवश्यक आहे.
यासाठी योग्य आहारासोबतच त्याचे प्रमाण आणि वेळही महत्त्वाची असते.
तुम्ही काय खात आहात यावर नजर ठेवण्यासोबतच तुम्ही दिवसातून किती प्रमाणात खाता, हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
पाश्चात्य संस्कृतीत दिवसातून तीन वेळा जेवण केले जाते. जे ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर या तीन वर्गात विभागले गेले आहेत.
अनेक आहारतज्ञ भूक नियंत्रित ठेवण्यासाठी या तीन वेळांमध्ये दोन एकस्ट्रा स्नॅक्स (सकाळी आणि दुपारी) करण्याचा सल्ला देतात.
जेव्हा तुम्ही आजारी असाल तेव्हा दिवसातून चार ते पाच वेळा जेवण्याचा किंवा काहीतरी खाण्याचा सल्ला देतो.
जर तुम्ही निरोगी असाल तर दिवसातून 3 वेळा खा.
सूर्यास्तानंतर जड जेवण किंवा पदार्थ खाणे टाळा. झोपेच्या किमान 2 ते 3 तास आधी जेवण करा.
मध्यरात्री भूक लागली असेल तर तुम्ही चिमूटभर जायफळ किंवा चिमूटभर हळद घालून दूध पिऊ शकता.