फळं खाणं आरोग्यासाठी अतिशय गुणकारी समजलं जातं. प्रत्येक फळाची अमुक अशी गुणधर्म असतात ज्यामुळं शरीराला कमाल फायदा होतो.
आहारतज्ज्ञसुद्धा उत्तम आरोग्यासाठी फळं खाण्याचा सल्ला देतात.
आहारातही फळांचा समावेश करण्याचा सल्ला ही तज्ज्ञ मंडळी देतात.
फळं खाण्यामध्ये अतिरेक मात्र चालत नाही. RDA म्हणजेच Recommended Dietary Allowance नुसार एका सुदृढ व्यक्तीनं दिवसातून 2 ते 3 फळांचं सेवन करणं योग्य.
आहारतज्ज्ञ आणि डॉक्टरांच्या माहितीनुसार एका वेळी 200 ग्रॅम इतकीच फळं खावीत.
एकाच वेळी जास्त प्रमाणात फळांचं सेवन केल्यास शरीरावर त्याचे दुष्परिणामही दिसू शकतात.