एकच बेडशीट किती दिवस वापरता? वेळीच ही सवय थांबवा नाही तर

Nov 08,2023


पलंगावर चादर किती दिवस ठेवावी? या प्रश्नाचं उत्तर एका सर्वेक्षणात विचारण्यात आलं. तेव्हा 4 महिन्यांपासून बेडशीट साफ करत नाहीत किंवा बदलत नसल्याचं धक्कादायक सत्य समोर आलं.


तर 12 टक्के लोकांनी सांगितलं की, त्यांना आठवण आली की ते चादर धुतात आणि तेही चार महिन्यांहून अधिक काळानंतर ही गोष्ट करतात.


अविवाहित महिला दर दोन आठवड्यांनी त्यांच्या बेडशीट बदलत असतात. काही जण तीन आठवड्यांनंतर बेडशीट बदलतात.


आपण दर आठवड्याला आपल्या बेडशीट स्वच्छ केल्या पाहिजे, असं स्लीप एक्सपर्ट डॉ. ब्राउनिंग सांगतात. नाही तर तुम्हाला आरोग्याच्या समस्या होऊ शकतात.


म्हाला येणारा घाम आणि बाहेरून येणारी धूळ, जंतू, घाण आणि जीवाणू शरीराला चिकटून असतात. अशास्थितीत ते चादरीला लागतात.


जर तुम्ही स्वच्छ चादर वापरली नाही तर तुम्हाला पेशी मृत असलेल्या पलंगावर झोपल्यामुळे आरोग्यास ते त्रासदायक ठरेल. शिवाय संशोधनानुसार एका महिन्याच्या जुन्या बेडशीटमध्ये 10 दशलक्षाहून अधिक बॅक्टेरिया असतात.


तुम्ही कधी विचार केला का की हॉटेलमध्ये आपल्याला चांगली झोप लागते. कारण ती स्वच्छ आणि चांगल्या दर्जाची असते. त्यामुळे चांगल्या झोपेसाठी चादर बदलणे गरजेचं आहे.


शास्त्रज्ञांचं मते दर 6 महिन्यांनी जुनी बेडशीट टाकून नवीन बेडशीट विकत घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे 3 आठवडे जुन्या बेडशीटमध्ये 9 लाख बॅक्टेरिया, 2 आठवडे जुन्या बेडशीटमध्ये 50 लाख आणि 1 आठवडे जुन्या बेडशीटमध्ये 45 लाख बॅक्टेरिया आढळतात.


आपली उशी यापेक्षाही घाणेरडी असते. आपला चेहरा आणि केस या उशीवर असल्याने तेलामुळे, घाम आणि मृत त्वचा बहुतेक उशीवर असतात. 4 आठवडे जुन्या उशीमध्ये 12 दशलक्ष बॅक्टेरिया असतात.

VIEW ALL

Read Next Story