वाईन किती दिवसात खराब होते?
वाईनची निर्मिती ही द्राक्षाचा रस आणि त्याच्या बियांपासून केली जाते.
वाईन ही अनेक वर्ष बाटलीत बंद करुन ठेवली जाते. यामुळे वाईनची चव वाढते.
व्हिस्की, टकीला आणि रम या दारुमध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे या दारु लवकर खराब होत नाहीत.
मात्र वाईनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण कमी आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते.
वाईनमध्ये 15 टक्के अल्कोहोल असते. त्यामुळे वाईनला एक्सपायरी डेट दिली जाते.
एखादी बाटलीबंद असलेले वाईन 5 वर्ष चांगल्या स्थितीत राहते.
पण वाईनची बाटली एकदा उघडल्यानंतर ती 3 ते 5 दिवसात संपवावी.
काही चांगल्या प्रतीच्या वाईन या जास्त काळही टिकतात.