तुम्हाला माहिती आहे का दिवसातून किती खजूर खावे?

Oct 08,2024


सकाळी उपाशी पोट खजूर खाणं आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. याशिवाय तुम्ही मधल्या वेळेत भूक लागल्यावरही खजूर खाऊ शकता.

खजूर खाण्याचे फायदे

खजूरमध्ये व्हिटॅमिन B6, पोटॅशियम, मॅग्नीशियम आणि आयर्न सारखे महत्त्वपूर्ण पोषकतत्त्वं आढळतात. महत्त्वाचं म्हणजे हे सगळे पोषकतत्त्वं आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहेत.

खजूरमधील घटक

खजूरमध्ये जास्त प्रमाणात नैसर्गिक सारख, ग्लुकोज, फ्रक्टोज आणि सुक्रोज असतं. ज्यामुळे तुमच्या शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यास आणि वाढवण्यास मदत होते.

किती खजूर खावे

खजूर खाणं शरीरासाठी गुणकारी मानलं जातं. जर तुम्ही एका लाभ 4-5 खजूर खात असाल, तर याने तुम्हाला अनेक फायदे होऊ शकता.

पचन

खजूरमध्ये फायबर भरपूर प्रमाणात आढळतं. त्यामुळे पचनासाठी मदत होते. बद्धकोष्ठता आणि पोटा संबंधीत समस्या कमी होतात.

हृदय

खजूरमध्ये पोटॅशियम असल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते. याशिवाय हृदयच्या आरोग्यासाठीही खजूर फायदेशीर असते.

वजन कमी करण्यास मदत

खजूर खाल्ल्यानं पोट खूप वेळ भरलेले राहतं. त्यामुळे आपल्याला सारखी भूक लागत नाही आणि वजन कमी करण्यास मदत होऊ शकते.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story