कधीकधी मुलांचं म्हणणंही ऐका; गौर गोपाल दास यांच्याकडून संगोपनाचा गुरुमंत्र
मुलांच्या संगोपनामध्ये काही गोष्टी पालकांनी प्रकर्षानं टाळाव्यात. आता या गोष्टी कोणत्या ते सांगितलं आहे आध्यात्मिक गुरु गौर गोपाल दास यांनी.
अनेकदा तुम्ही तांत्रिकदृष्ट्या योग्य असता पण, तेव्हाच तुमची मुलंही प्रत्यक्षात चुकलेली नसतात हे लक्षात घ्या. त्यामुळं तुम्ही काही मर्यादांपलीकडे जाऊन विचार करा.
तुमची मुलं तुम्हाला न पटणाऱ्या पद्धतीनं का वागत आहेत याचा विचार करा. तुम्ही त्यांच्या जागी राहून विचार करा, तेव्हा कुठं हा तिढा सुटेल.
मुलांची अती काळजी करणं टाळा असं गौर गोपाल दास नेहमी सांगतात. प्रत्येक वेळी त्यांना काय करायचंय आणि काय नाही हे सांगत राहू नका. मुलांना त्यांचे निर्णय घेण्यास समर्थ करा.
अनेकदा मुलांच्या अडचणी स्वत:वर घेऊन पालक त्यावर तोडगा काढू लागतात. इथंच मुलांना परिस्थितीशी दोन हात करण्याचा अंदाजच येत नाही. महत्त्वाचे सोडा पण, मुलांना काही लहानसहान निर्णयही अशानं घेता येत नाहीत.
गौर गोपाल दास यांच्या मते मुलांना असे निर्णय घेऊन द्या ज्यामुळं ते परिपक्व होऊ शकतील. निर्णय घेण्यासाठी मुलांना मदत करा, मात्र निर्णय घेण्यापूर्वी त्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न करू नका.