होळीसाठी फुल स्लीव्ह टॉप, कुर्ता आणि पँट घाला. असे कपडे तुम्हाला रंगांपासून सुरक्षित ठेवण्याचे काम करतील. डोळ्यांसाठी गॉगल अथवा सनग्लासेस वापरण्याची खात्री करा.
होळीचे रंग खेळताना स्वतःला हायड्रेटेड ठेवणे देखील खूप महत्वाचे आहे. वेळोवेळी पाणी प्यायले पाहिजे. अथवा ज्यूसचे सेवन करा. याच्या मदतीने तुम्ही उष्णतेचा प्रादुर्भाव टाळू शकता.
होळी खेळण्यापूर्वी तुम्ही आईस क्युब्स म्हणजेच बर्फाचे तुकडे वापरू शकता. हे आईस क्युब्स 10 मिनिटे चेहऱ्यावर फिरवून घ्या. त्यामुळे हत्वचेची छिद्रं बंद होतात व त्यामुळे रंग त्वचेत जात नाही.
होळीचे रंग चेहऱ्यावरही लावले जातात. अशा वेळी डोळ्यांची तसचे ओठांचीही काळजी घेणे महत्वाचे ठरते. डोळ्यांवर गॉगल लावा तसेच ओठांसाठी लिप बाम नक्की वापरा.
त्वचेसाठी सनस्क्रीन अवश्य वापरावे. रासायनिक रंग आणि हानिकारक अतिनील किरणांमुळे त्वचेचे खूप नुकसान होते. होळीच्या काही दिवस आधी त्वचेसाठी स्क्रब वापरणे टाळा.
होळी खेळण्यापूर्वी त्वचेसाठी मॉयश्चरायजर वापरा. खोबरेल तेल, बदाम तेल आणि तिळाचे तेल देखील चेहरा आणि शरीरासाठी मॉयश्चरायजर म्हणून वापरले जाऊ शकते.