भारतात मोठ्या प्रमाणात चहा सोबत भजी खाल्ली जातात. मग पावसाळा असो किंवा इतर कोणता ऋतू लोक चहा आणि भज्यांचा मनसोक्त आनंद लुटतात.
भजी तळण्यासाठी खूप तेलाचा वापर केला जातो आणि चहात कॅफिन असते. हे दोन्हीही आरोग्यासाठी हानिकारक आहे.
आता दोन नुकसानकारक पदार्थ जर एकत्र खाल्ले तर निश्चितच त्याचा जास्त त्रास होईल. चला जाणून घेऊया चहा सोबत भजी खाल्याने शरीराचे काय नुकसान होते?
चहा आणि भजी एकत्र खाल्यास बॅड कोलेस्ट्रॉल वाढते.
जर तुम्ही नेहमी चहा सोबत भजी, समोसे, वडे खात असाल तर तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास सुरू होऊ शकतो.
चहासोबत भजी खाल्याने तुम्हाला हृदया संबंधीत आजार होण्याची शक्यता वाढते.
चहा आणि भजीच्या एकत्र सेवनाने बद्धकोष्ठता, गॅस यासारख्या पोटाच्या समस्याही उद्भवू शकतात.
चहा सोबत कोणताही तेलकट पदार्थ खाल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)