आपण अनेक वेळा बाहेर गेल्यावर तहान लागल्यास पाणी विकत घेतो.
पण हे बाटलीमधील पाणी आरोग्यासाठी घातक असल्याच फार कमी लोकांना माहिती आहे.
जर तुम्ही सतत पाणी पिण्यासाठी प्लास्टिकचा वापर करत असाल तर तुमच्या शरीरात स्लो पॉयझन पोहोचत आहेत.
प्रोसीडिंग्स ऑफ द नेशनल एकेडमी ऑफ साइंसेज नावाच्या एका संस्थेने एका अभ्यासात धक्कादायक खुलासा केला आहे
ज्यामध्ये प्लास्टिकच्या बाटलीमध्ये सतत पाणी पिल्याने मधुमेह, हृदयविकार आणि कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
बाटलीमध्ये असणारे लहान प्लास्टिकचे तुकड्यांमुळे रक्ताभिसरण तसेच मेंदू आणि पेशींचे नुकसान होते.