असं म्हणतात की, दिवसभरात तीन ते चार लीटर पाणी शरीरात जाणं आवश्यक आहे. मात्र धावपळीच्या दैनंदिन जीवनशैलीमुळे आपलं आरोग्याकडे दुर्लक्ष होतं.
शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशनचा त्रास होतो. सतत घसा कोरडा पडणं आणि तहान लागणं हे डिहायड्रेशनचं लक्षण आहे.
जर तुम्हाला नारंगी किंवा गडद पिवळ्या रंगाची लघवीला होत असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डिहायड्रेशनमुळे मुत्रपिंडावर गंभीर परिणाम होतात. म्हणूनच तुम्ही पाणी भरपूर पिणं गरजेचं आहे.
शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे अशक्तपणा येतो. त्यामुळे चक्कर येणं, डोकं दुखणं हा त्रास जास्त होतो.
बऱ्याच जणांना थंड वातावरणात किंवा रात्री झोपेत पायात गोळे येतात. पाय दुखतात. ही लक्षणं डिहायड्रेशनची असल्याचं डॉक्टर सांगतात.
पोट साफ होत नसेल किंवा शौचाला गेल्यावर रक्त पडणं ही समस्या पाणी कमी प्यायल्यामुळे होते. म्हणूनच बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर पाणी भरपूर पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
शरीरात पाणी कमी असल्याने त्वचेवर सुरकुत्या पडतात. त्वचा कोरडी पडते. हे डिहायड्रेशन होत असल्याचे संकेत आहेत.
जर तुम्हाला माऊथ अल्सर किंवा जीभ कोरडी पडण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही भरपूर पाणी पिण्याची गरज आहे.
डिहायड्रेशनचा गंभीर परिणाम तुमच्या शरीराप्रमाणेच मानसिक आरोग्यावर ही होतो. योग्य निर्णय घेता न येणं किंवा सतत गोंधळून जाणं हे शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे होतं. (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)