निरोगी राहण्यासाठी पुरेशी झोप घेणे गरजेचे असते.
अनेक डॉक्टरही 7 ते 8 तासांची झोप घेण्याचा सल्ला देतात.
सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेकांची झोप पूर्ण होत नाही आणि अपूर्ण झोपेमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवतात.
तुमच्या झोपेचे चमकदार त्वचेशी अनोखं कनेक्शन आहे.
रात्री झोपेत आपल्या त्वचेत कॉलेजन आणि इलेस्टिन हे घटक निर्माण होतात.
आपल्या त्वचेला कोलेजन आणि इलास्टिनमुळे शक्ती आणि लवचीकपणा मिळतो. या दोन घटकाचा मोठा फायदा तुमच्या त्वचेला होतो.
योग्य प्रमाणात झोप घेतल्याने चेहऱ्यावरील तेज वाढते. यामुळे तुमच्या मेंदूची कार्यक्षमताही वाढते.
योग्य झोपेमुळे तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार होते.